राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तयार होत आहे- डॉ.अनिल गवळी रुकडी - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तयार केला जात आहे. त्यामुळे पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. असे मत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे मानव्यविद्या विभागाचे माजी अधिष्ठाता डॉ. अनिल गवळी यांनी व्यक्त्त केले. ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, शिवाजी विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळ, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि नारायणदास दामोदर भंडारी फाउंडेशन इचलकरंजी यांच्या संयुक्त्त विद्यमाने आयोजित केलेल्या बी.ए. भाग - तीन मराठी या विषयाच्या बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित शिक्षक प्रशिक्षण शिबिरामध्ये बीजभाषक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.(डॉ.) प्रशांतकुमार कांबळे होते. स्वागत व प्रास्ताविक श्री. चिंतामणी कांबळे यांनी केले. उद्घाटन समारंभावेळी रो. प्रमोद महाजन, रो.यतिराज भंडारी, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. भरत जाधव यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त्त केले. दिवसभर चाललेल्या या शिबिरात साहित्यशास्त्र आणि अनुभव कथन- डॉ. देवानंद सोनटक्के, मध्ययुगीन मराठी वाड्:मयाचा इतिहास- डॉ. धनंजय होनमाने, भाषा आणि भाषा विज्ञान डॉ. युवराज देवाळे, आज्ञापत्र- डॉ . मांतेश हिरेमठ, मराठी भाषा व रोजगाराच्या संधी- डॉ. अरुण शिंदे, निवडक विनोदी वाड्:मय - डॉ. रफिक सुरज मुल्ला यांनी मार्गदर्शन केले. सत्राध्यक्ष म्हणून डॉ. यशवंत चव्हाण व डॉ.दीपककुमार वळवी यांनी काम पाहिले. समारोप समारंभावेळी शिवाजी विद्यापीठ मराठी विभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिरात शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील मराठी विषयाचे सुमारे १३० पेक्षा जास्त शिक्षक उपस्थित होते. प्रशिक्षण शिबिराचे समन्वयक डॉ. गिरीश मोरे होते. हे प्रशिक्षण शिबिर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी यशस्वीपणे पार पाडले. आभार सौ. सविता शिंदे यांनी मानले. तर सूत्रसंचालन सौ. प्रियांका थोरात यांनी केले.
राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय रूकडी या महाविद्यालयातील रोटरॅक्ट क्लब ऑफ राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय रुकडीच्या नूतन अध्यक्षपदी रो. दिव्या माने, सेक्रेटरी पदी रो. अमित पाटील तर खजिनदार पदी रो. गौरी कोळी यांची निवड करण्यात आली. या पदग्रहण सोहळ्यासाठी रो.संजय होगाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, रुकडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमाला
दिनांक ३१ मे २०२६ रोजी महाविद्यालयामधील इतिहास विभाग प्राध्यापक डॉ शर्मिला साबळे ह्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण कोल्हापूर, आदरणीय श्री डॉ प्रकाश बच्छाव साहेब यांनी डॉ शर्मिला साबळे यांच्या भविष्य निर्वाह निधी अंतिम रक्कम अदायगीस मान्यता आदेशचे निवृत्ती दिनास महाविद्यालयास दिले होते . सदर पत्र डॉ शर्मिला साबळे यांना महाविद्यांयालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे यांच्या हस्ते सुपूर्द केले. अगदी वेळेत तो आदेश दिल्याबद्दल आदरणीय डॉ प्रकाश बच्छाव साहेबांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद.
दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी महाविद्यालयामधील मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ लता मोरे ह्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण कोल्हापूरचे आदरणीय श्री डॉ प्रकाश बच्छाव साहेब यांनी मोरे मॅडम यांच्याभविष्य निर्वाह निधी अंतिम रक्कम अदायगीस मान्यता आदेशचे पत्र काल महाविद्यालयास दिले होते . ते पत्र मोरे मॅडम यांना मा. माजी खासदार डॉ निवेदिता माने यांच्या हस्ते सुपूर्द केले. अगदी वेळेत तो आदेश दिल्याबद्दल आदरणीय डॉ प्रकाश बच्छाव साहेबांचे आभार. यापूर्वी असे कधीही घडलेले नव्हते मा.बच्छाव साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद